बाबा हा शब्द ऐकल्यावर एक नकळत अशी आदर,प्रेम अश्या भावना निर्माण होतात.जो स्वतापेक्षा जास्त आपल्या मुलांबद्दल विचार करतो तो म्हणजे बाप असतो. अश्या बापा बद्दल जेवड लिहाव तेवड कामीच आहे . मला जेवड जमेल तेवड लिहण्याचा प्रयत्न केला आहे तरी मला आपण comment करून आपल्या कविता सांगा म्हणजे मी त्या आपल्या प्रेक्षकांपर्यन्त पोहचवण्याचे काम करीन आणि यामुळे आमच्या संग्रहात भर पडेल.
माझ्या प्रिय बाबा, मी कुठून सुरुवात करू? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत, कितीतरी आठवणी ज्या मला शेअर करायच्या आहेत आणि अनेक मार्गांनी मला माझे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तू माझ्या आयुष्यात सततची उपस्थिती आहेस, सामर्थ्य आणि समर्थनाचा स्रोत आहेस आणि एक आदर्श आहे ज्याची मी प्रशंसा करतो आणि आदर करतो.
माझा जन्म झाल्यापासून तू माझ्यासाठी आहेस. तू मला आपल्या हातात धरलेस, मी जेव्हा रडलो तेव्हा माझे सांत्वन केले आणि मी माझे पहिले पाऊल टाकल्यावर मला आनंद दिला. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते माझ्या हायस्कूल ग्रॅज्युएशनपर्यंत आणि त्यादरम्यानच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांसाठी तिथे होता.

Marathi Poems on Father
बाप ❣🙏
“सावली देऊन लेकरांस स्वतः ऊन्हामध्ये राबतो.
आयुष्यभर लेकरांसाठी धडपडत असतो.
सोन व्हावं जीवनाचं त्यांच्या म्हणून तळमळ करतं असतो.
स्वतःसाठी जगण्याचं ही भान त्यांना नसते.
कठोर मन असतं त्यांचं पण लेक सासरी जातांना हंबरडा फोडतो.
लेकीसाठी बापाचं मन हळवं होतं.
आजवर होती आमची आता झाली तुमची
म्हणून लेकीचा हात जावया कडे देतांना हृदय त्यांच भरुन येते.
घळाघळा अश्रू धारा डोळ्यातून वाहते.
आयुष्यभर गरजांची पूर्तता करणारा बापच एकमेव असतो.
आपण कधीच नाही समजू शकणार एवढं बापाचं मन मोठं असते….
स्वत: टपरा मोबाईल वापरुन,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल,
घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै
स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी
जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो,हॅपी फादर्स डे!
पिता……
सूर्यप्रमाणे तळपालणाऱ्या जिवाच्या वाटेवर
मायेची सावली तुम्ही जीवनातील दुःखरुपी….
युद्ध व माझ्यातील…… ढाल बनता तुम्ही……..
`वडील ´ असतो वाडासारख्या मातीत घट्ट
रुतून कुटुंबाला सावली देणारा तो बाप असतो
स्वतः ऊन सोसवणारा पण लेकरांच्या पंखात बळ देणारा
कुटूंबाचे छत्र होऊनी मायेची सावली
दारणारा माझ्या जगण्याला अर्थ आहे
तो केवळ तुमच्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य केवळ
तुमच्या सेवेत सुचलं तर खूप काही आहे
पण देवाबद्दल लिहावे शब्द अस्तित्वात नाहीत
एवढे बाबा जरी सांगता येत नसलं
तरी तुम्हीच आहात माझे सर्वस्व माझे बाबा आहेत
प्रेमाचं एक अतूट झरा प्रेमाने जवळ ही घेतेत माझे बाबा आहेत
एक सावली देव म्हणावे तरी कसे तुम्हला
तुम्ही तर त्याहुनी श्रेष्ठ माझ्यासाठी देव देतो
सुख दुःख दोन्ही पण तुम्ही सुखाने भरले आयुष्य
माझे तुम्ही पूर्व जन्माची पुण्याई माझी लाभले
पिता म्हणुनी तुम्ही हीच धन्यता माझी……….
🙏 स्वरचित कविता : आरती संभारम
ज्यांचा नुसता खांद्यावर
हात जरी असला,
तरी समोरच्या संकटांना,
लढा देण्याची प्रेरणा मिळते,
अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,
जी तुम्हाला जवळ घेते,
जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते,
जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,
जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,
जेव्हा तुम्ही हरता,
हॅपी फादर्स डे!
ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,
त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,
कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,
कारण बाप असतोच जीवनाचा आधार,
पितृदिनाच्या शुभेच्छा!
माझे बाबा कविता
बाबा, तुम्ही आहात म्हणून
माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,
माझ्या यशाची चमक जेव्हा मला
तुमच्या डोळ्यात दिसते,
तेव्हा मी भरुन पावतो,
अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!
बाबा वर कविता
तू मला आयुष्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि एक चांगला माणूस होण्याचा अर्थ काय याबद्दल खूप काही शिकवले आहे. तुम्ही माझ्यामध्ये मूल्ये आणि नैतिकतेची तीव्र भावना निर्माण केली आहे आणि प्रामाणिकपणा आणि दयाळूपणे जगणे म्हणजे काय हे तुम्ही उदाहरणाद्वारे मला दाखवले आहे. माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास तू मला प्रोत्साहन दिलेस, ते अशक्य वाटत असतानाही, आणि माझा स्वत:वर विश्वास नसतानाही तू नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहेस.
तुमच्याबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबाप्रती तुमची अटळ बांधिलकी. आपण नेहमीच आम्हाला प्रथम स्थान दिले आहे, त्याग करून आणि आम्हाला प्रदान करण्यासाठी आणि आम्हाला सर्वोत्तम जीवन देण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. तुम्ही आमच्या जीवनात एक स्थिर उपस्थिती आहात, नेहमी ऐकण्यासाठी, एक सांत्वन देणारी मिठी किंवा मदतीचा हात देण्यासाठी.
शोधून मिळत नाही पुण्य,
सेवार्थाने व्हावे लागते धन्य,
कोण आहे तुझविणं अन्य?
‘बाबा’
तुजविण माझं जग आहे शून्य, हॅपी फादर्स डे!
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे,
ती केवळ तुमच्यामुळे आहे,
माझ्या जगण्याला अर्थ आहे,
तो केवळ तुमच्यामुळे आहे,
माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे,
माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे,
हॅपी फादर्स डे!
देव देवळात नाही,
तो माझ्या बाबांमध्ये आहे,
अशा माझ्या लाडक्या बाबांना
पितृदिनाच्या शुभेच्छा!
काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,
तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,
कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,
घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे
बापमाणूस,
तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज,
हॅपी फादर्स डे!
बाप हाच देव ।मायेचा सागर ।
प्रेमाचे आगर । माझ्यासाठी… ॥
पकडले बोट । तात माझा गुरू ।
आयुष्य हे सुरू । बापामुळे… ॥
बाबांचे लाडाचे रुप म्हणजे मुलगी,
पण बाबा तुमच्या रुपाने मला मिळाला एक चांगला मित्र,
कोणी सोबत नसले तरी मला मिळावी तुमची साथ
बाबा म्हणून तुम्ही मला मिळावे जोपर्यंत असे आयुष्याची साथ
वडील म्हणजे अशी एक व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते,
तुम्हाला ओरडते,
जेव्हा एखादी चूक तुम्ही करता,
तुमच्या यशाचा आनंद
साजरा करता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते,
जेव्हा तुम्ही हरता,
हॅपी फादर्स डे
वडिलांविषयी कविता
बाबा अचानक निघून गेला..
खूप बोलायचं राहूनच गेलं, व्यक्त व्हायचं राहून गेलं,
बराच रागीट आणि तितकाच प्रेमळ बाबा,
शिस्त लावणारा आणि मी लवकर घरी नाही
आले तर काळजीने व्याकुळ होणारा,लाडाने पिंट्या हाक मारणारा आणि
मी चिडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा
तो आनंद आजही डोळ्यातून जात नाही,
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,स्वतःची झोप आणि भूक न विचार
करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न
असणारा बाबा,तुमचा तो प्रत्येक गुण आणि दोष
माझ्यात असल्याचा सार्थ अभिमान आहे,तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे,माहीत आहे तुम्ही परत नाही येणार
पण माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा नक्की असणार,
ज्यांना असतो बाबा कदाचित त्यांना पर्वा नसते,
पण खरंच सांगते, बाप हा बाप असतो,वरून कणखर पण मनातून तो फक्त
आपला असतो,आजही लोकांच्या मुलांना
बापाबद्दल बोलताना पाहून जीव गलबलतो,
वाटतं अजूनही अचानक डोक्यात टपली
मारून माझी कळ नक्की काढेल बाबा,ती माया, ते प्रेम, तो सहवास,
मी दूर जाताना डोळ्यात आलेलं पाणी
लपवण्याचा प्रयत्न कधी लपलाच नाही,
माझ्यातून मी कधी तुम्हाला दूर होऊ दिलंच नाही,शेवटच्या क्षणीदेखील तुमचा हात घट्ट
पकडला होता आणि अजूनही त्याच आधारावर
आयुष्य काढायची ताकत तुम्ही दिलीत,
बाप नक्की कसा असावा तर तुमच्यासारखा…
हॅपी फादर्स डे!– दिपाली नाफडे..
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत…
डोळ्यात न दाखवताही
जो आभाळाइतकं प्रेम करतो
त्याला वडील नावाचा
राजा माणून म्हणतात,
हॅपी फादर्स डे!
बाबा तुमचा प्रत्येक शब्द,
माझ्या लक्षात आहे, बाबा
माझा प्रत्येक आनंद हा
तुमच्याशिवाय अपूर्ण आहे,
हॅपी फादर्स डे!
आठवतं का बाबा सकाळी उठून तुम्ही मला पार्कात घेऊन जायचा,
माझ्यासोबत खेळता खेळता तुम्ही बाबाचे मित्र व्हायचा,
तोच मित्र मला हवा माझ्यासोबत कायम, लव्ह यू बाबा
बापावर कविता
ज्यांचं न दिसणार प्रेम
आम्हाला भरभरुन प्रेम देतं,
अशा माझ्या वडिलांना,
हॅपी फादर्स डे!
प्रत्येक वेळी खाली पडल्यावर
जो मला उचलतो, तो माझा बाबा,
चुका केल्यावर ओरडतो,
पण तरीही सावरुन घेतो, तो बाबा असतो,
हॅपी फादर्स डे!
बाबा, दणकट बाहू आहेत तुमचे,
सांगा कसा बरं खाली पडेन,
तुम्हीच माझा आधारवड,
शेवटपर्यंत तुम्हाला मी जपेन,हॅपी फादर्स डे!
कोडकौतुक वेळप्रसंगी,
धाकात ठेवी बाबा,
शांत प्रेमळ कठोर,
रागीट बहुरुपी बाबा,
हॅपी फादर्स डे!
आपले दु:ख मनात लपवून,
संपूर्ण परिवाराची काळजी करणारा,
काही कमी नको पडायला म्हणून
स्वत:च्या इच्छा आकांक्षा मागे ठेवणारा,
असतो तो बापमाणूस, हॅपी फादर्स डे!
आकाशालाही लाजवेल अशी उंची
आणि आभाळालाही लाजवेल असे,
कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ‘बाबा’,
हॅपी फादर्स डे!
जसजसे मी मोठे झालो आहे तसतसे तुझ्याबद्दलचे माझे कौतुक अधिकच वाढले आहे. तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केलेले त्याग आणि तुम्ही माझ्या आयुष्याला ज्या अनेक मार्गांनी आकार दिलात ते मला समजले आहे. तुम्ही मला कठोर परिश्रम, चिकाटी आणि लवचिकतेचे महत्त्व शिकवले आहे आणि एक चांगली व्यक्ती आणि चांगले पालक होण्याचा अर्थ काय आहे हे तुम्ही मला दाखवले आहे.
तर, माझ्या प्रिय बाबा, मी तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी किती कृतज्ञ आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. माझ्या दृष्टीने तू खरा हिरो आहेस आणि तुला माझे बाबा म्हणून लाभले म्हणून मी खूप भाग्यवान आहे. वर्षानुवर्षे तुम्ही मला दिलेल्या प्रेम, समर्थन आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. मी नेहमी आमच्या आठवणी एकत्र जपत राहीन, आणि येत्या काही वर्षात मी आणखी बरेच काही तयार करण्यास उत्सुक आहे.